पातूर प्रतिनिधी:-दि. २१ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त वंदनाताई जगन्नाथराव धोने ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय,पातूर येथील स्वास्थ्यवृत्त व योग विभागाच्या वतीने भव्य आयुर्वेद जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात रण्यात आले होते

“आयुर्वेदाचा स्वीकार करा – निरोगी जीवन जगा”चा संदेश; विद्यार्थी,शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आयुर्वेदाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे,निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे तसेच रोगप्रतिबंधाबाबत जनजागृती करणे हा रॅलीचा प्रमुख उद्देश होता.महाविद्यालयाच्या परिसरातून रॅलीचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.यामध्ये प्राध्यापक,वैद्यकीय शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.विद्यार्थ्यांच्या हातातील आयुर्वेद,योग, आरोग्यसंवर्धन, रोगप्रतिबंध,पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारे आकर्षक फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.आयुर्वेदाचा स्वीकार करा निरोगी जीवन जगा.निरोगी व्यक्ती, निरोगी समाज,निरोगी पृथ्वी”अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.योग्य आहार-विहार,दिनचर्या,ऋतुचर्या,योग तसेच आयुर्वेदिक जीवनशैलीचा अवलंब केल्यास आरोग्याचे संवर्धन करण्यास मदत होते,असा संदेश रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.आयुर्वेद ही केवळ आजार झाल्यानंतर उपचार करणारी चिकित्सा पद्धती नसून निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकविण







