महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत मारली बाजी…
पातूर (प्रतिनिधी) – शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही अव्वल असलेल्या पातूर येथील वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने कुस्ती स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे.नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या वयोगटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर प्रवेश मिळवला आहे.या स्पर्धेत कु.अक्षरा अनिल गवई हिने 17 वर्षे वयोगटात चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.मुलींच्या कुस्तीत तिने दाखवलेले कौशल्य विशेष कौतुकास्पद ठरले.

तर 19 वर्षे वयोगटात करण अरुण पवार आणि करण किसन सिरस्कार यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक मिळवला.या तिन्ही विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.खेळाडूंच्या या यशस्वी कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक / सचिव मा.श्री. रामसिंगजी जाधव साहेब,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. एफ.पी.राठोड सर आणि क्रीडा प्रशिक्षक श्री.सी.ए.वाघ सर यांनी तिन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व येणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.या तिन्ही विजयी कुस्तीपटूंचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.







