जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेकरिता निवड…
पातूर (प्रतिनिधी) -जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय,अकोला यांच्यावतीने'बेटी बचाव,बेटी पढाव'अंतर्गत मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे,लैंगिक समानतेची जाणीव निर्माण करणे तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने विविध स्पर्धांचे तालुकास्तरीय आयोजन नुकतेच पातूर येथे करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,पातूरच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले.या वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.पुनम गाडगे हिने द्वितीय क्रमांक पटकावला,तर वाद-विवाद स्पर्धेमध्ये कु.प्रतीक्षा बोरकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.तसेच त्यांची जिल्हास्तरीय वक्तृत्व व वाद-विवाद स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.या स्पर्धेकरिता तालुक्यातील असंख्य स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक,सचिव श्री.रामसिंगजी जाधव साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.एफ. पी.राठोड सर यांनी कौतुक केले







