भगव्या ध्वजाच्या साक्षीने शेकडो महिला-पुरुषांसह बालकांचा सहभाग; धर्मजागृतीच्या घोषणांनी शहर दुमदुमले
पातूर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पातूर विभागाच्या वतीने अष्टमीच्या पहाटे आयोजित करण्यात आलेली श्री दुर्गा दौड मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाली.या दौडीत शहरातील लहान मुले-मुलींसह शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते.भगव्या ध्वजाच्या साक्षीने निघालेल्या या दौडीमुळे संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

श्री दुर्गा दौडीची सुरुवात संत श्री सिदाजी महाराज मंदिर येथून करण्यात आली.छत्रपती श्री संभाजी महाराज चौक, गुरुवार पेठ,भगत वेटाळ,कासार वेटाळ,तेलीपुरा,बाळापूर वेस, रेणुकादेवी मंदिर,शिवस्मारक,खडकेश्वर जगदंबा मंदिर आणि गुजरी लाईन या मार्गाने मार्गक्रमण करत दौड पुन्हा संत श्री सिदाजी महाराज मंदिर येथे पोहोचली.याठिकाणी दौडीची सांगता करण्यात आली.दौडीदरम्यान प्रेरणा मंत्र,ध्येय मंत्र, विविध धार्मिक श्लोक आणि गीतांसह धर्मजागृतीच्या घोषणा देण्यात आल्या. ‘जय श्रीराम’, ‘जय भवानी,जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.शहरातील विविध ठिकाणी महिलांनी दौडीतील प्रमुख आकर्षण असलेल्या भगव्या ध्वजाचे तसेच शस्त्र पथकातील शस्त्रांचे पूजन करून श्रद्धा व्यक्त केली.मान्यवरांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजनदौडीच्या प्रारंभी माजी उपनगराध्यक्ष राजूभाऊ उगले, भाजपचे शहराध्यक्ष गणेश गाडगे,पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक डॉ.शिवकुमारसिंह बायस,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पातूर तालुका विभागप्रमुख धारकरी विजय राऊत,शहरप्रमुख किरण राखोंडे आणि सुहास देवकर यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले.
यावेळी रेणुकामाता मंदिर संस्थानचे अध्यक्ष शंकरराव नाभरे यांच्यासह शंकरराव बोचरे, डॉ.नालिंदे, ह.भ.प.लक्ष्मणराव बारताशे,रवी देवकर,विजय देवकर,रमेश काळपांडे गुरुजी आदींनीही ध्वजपूजन केले.बाल धारकऱ्यांसह शेकडो नागरिकांचा सहभाग


या दुर्गा दौडीत धारकरी विशाल बावस्कार,जीवन राऊत, कृष्णा कांबळे,शिवा सौंदळे,संदेश शिंदे,अथर्व गाडगे,चैतन्य राऊत,आकाश गाडगे,राहुल गाडगे,राजेश राऊत,श्रीकृष्ण खंडारे,पवन शेगर,आकाश शिंदे, देवांश शिंदे,तुषार वाघमारे, कौशिक सोनवणे,सोपान वाघमारे,शिवा निमकंडे,सार्थक गाडगे,महेश बोचरे,वैभव वाघमारे,विशाल सौंदळे,अभय भुजबटराव, आयुष इंगळे,शौर्य इंगळे,पवन वाघमारे,साहिल मेसरे, संकेत वांडे,प्रमोद घाटे,पवन घोरे,चक्रधर माळी,स्वप्नील इंगळे,मेजर गणेश बोचरे,शुभम इंगळे,जय देवकर,राजू हिरळकार,आणि अमोल राऊत यांच्यासह अनेक धारकऱ्यांनी सहभाग घेतला.तसेच गंगा राखोंडे,नीतू ढोणे,उज्वला हिरळकार,अलका राऊत,ऊषा राऊत,अंजली राऊत,भारती इंगळे,वैशाली हिरळकार,सीमा गाडगे,प्राची राऊत,वैष्णवी राऊत, सुनीता घाटे,चंचल घाटे,प्राजक्ता घाटे आणि भूमी राखोंडे,अयोध्या,निधी फुलारी,ईश्वरी गाडगे,वीर गाडगे,यांच्यासह शहरातील शेकडो महिला व पुरुष या दुर्गा दौडीत सहभागी झाले होते.





