पातूर प्रतिनिधी : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी पातूर येथील महात्मा ज्योतिराव फुले स्मारक,छत्रपती श्री संभाजी चौक येथे ‘चरखा संगम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत झालेल्या या कार्यक्रमात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.चरखा हा केवळ सूतकताईचे साधन नसून तो माणसाला संयम,आत्मभान,आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन शिकवतो.सूताचा एकेक तंतू जोडताना मनातील विचारही जुळत जातात.तुटलेले तंतू पुन्हा जोडताना माणूस स्वतःशीच नव्याने जोडला जातो,असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक यशोदाबाई वानखडे,राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उगले,किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश गावंडे,डॉ.सुनील आवटे,शेख मुख्तार सर,तलाठी डाबेराव,मोहन गाडगे,किरणकुमार निमकंडे,राजेंद्र निमकंडे,विलास धोंगळे,संतोष गिर्हे,संदीप देशमुख,बब्बुभाई,अनिल म्हैसने,प्रभाकर कवर,सेवानिवृत्त एएसआय मो.हयात,सुधाकर शिंदे,रमेश सोळंके,राजू तायडे,गणोरकर भाऊ,संदीप बंड,गणेश घोडके,ऋतिक हिरळकार,स्वरा बंड,राघव बंड यांच्यासह शहरातील असंख्य नागरिक सहभागी झाले.महात्मा गांधींच्या विचारांना कृतीची जोड देता चरख्याच्या माध्यमातून संयम,स्वावलंबन आणि आत्मचिंतनाचा संदेश देणारा हा उपक्रम ठरला.







