महात्मा फुले विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
अकोला : महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमारजी गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावता परिषदेतर्फे अकोला येथील महात्मा फुले विद्यालय, उमरी येथे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणरावजी आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले.
या कार्यक्रमाला सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे, प्रदेश सचिव प्रवीण वाघमारे, अकोला जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव निखाडे, महानगराध्यक्ष दिनेश सोळंके, महिला जिल्हाध्यक्ष मीराताई मसणे, सुनील उमरकार, दिलीप गिर्हे, रमेश भड, उपाध्यक्ष प्रवीण निलखन, महानगर सचिव हरीश नावकर यांच्यासह युवा उद्योजक उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक होले सर उपस्थित होते. अकोला जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव निखाडे यांनी विद्यार्थ्यांना सावता परिषदेच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. समाजातील गरजू घटकांना मदत करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे, या कार्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष अंकित जगताप, तालुकाध्यक्ष अजय ढोणे, संकेत म्हैसने, महेंद्र राऊत, रोहन झगडे यांच्यासह सावता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







