पातूर प्रतिनिधी:
अकोला जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या पंचायतराज समितीच्या पथकाने गुरुवारी पातूर तालुक्याला भेट देऊन विविध विकासकामे,ग्रामपंचायतींचे दस्तऐवज आणि पंचायत समितीच्या प्रशासकीय कारभाराची प्रत्यक्ष पाहणी केली.गेल्या काही वर्षांत तालुक्यात झालेल्या कामांचा आणि प्रशासकीय पारदर्शकतेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.बाभुळगाव ग्रामपंचायतीत दस्तऐवजांची तपासणी पंचायतराज समितीच्या या गटाचे नेतृत्व आमदार विक्रम काळे यांनी केले असून, समितीमध्ये आमदार जयंत आजगावकर व आमदार किरण लहामटे यांचा सदस्य म्हणून समावेश होता.समितीने सर्वप्रथम बाबुळगाव ग्रामपंचायतीला भेट दिली.तेथे ग्रामपंचायतीच्या विविध नोंदी,शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि विकासकामांच्या कागदपत्रांची बारकाईने पाहणी केली.जीर्ण इमारतीबाबत राज्य शासनाकडे शिफारस करणारत्यानंतर समितीने पातूर पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.पाहणीदरम्यान पंचायत समितीची प्रशासकीय इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असल्याचे समोर आले.अशा धोकादायक इमारतीत प्रशासकीय कारभार सुरू असल्याबद्दल समितीचे गटप्रमुख आमदार विक्रम काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.या इमारतीच्या नूतनीकरणाबाबत व नवीन प्रश्नाबाबत राज्य शासनाकडे विशेष शिफारस करण्यात येईल,असे त्यांनी स्पष्ट केले.त्रुटींच्या पूर्ततेसाठी अधिकाऱ्यांना मुदत समितीने ग्रामसेवक,अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची झाडाझडती घेतली.पाहणीदरम्यान ज्या त्रुटी आढळून आल्या, त्यांची तातडीने पूर्तता करून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी संबंधित अधिकारी,कर्मचारी व ग्रामसेवकांना समितीने विशेष मुदत दिली आहे.शुक्रवारी मांडला जाणार लेखापरीक्षण अहवाल दरम्यान,पातूर पंचायत समितीच्या संपूर्ण कामकाजाचा लेखापरीक्षण (ऑडिट) अहवाल शुक्रवारी जिल्हा परिषदेत आयोजित विशेष सभेत सादर केला जाणार आहे.या अहवालाच्या आधारे पंचायतराज समिती पुढील दिशा ठरवणार असल्याने,तालुक्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांसह नागरिकांचेही या सभेकडे लक्ष लागले आहे.या पाहणी दौऱ्याप्रसंगी पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO),कृषी अधिकारी,विविध ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक तसेच विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







