पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा
अकोला प्रतिनिधी : अकोला जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या परिसरात ३० वृक्षांची लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा कार्यक्रम न करता वृक्षारोपणासारखा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. ‘वृक्ष लावा,पर्यावरण वाचवा’ हा संदेश देत वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.या उपक्रमामुळे कार्यालय परिसरात हिरवाई वाढण्यास मदत होणार असून,पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे प्रशासिक अधिकारी अशोक आसोलकर,केंद्रनायक दिपक राजपूत,प्रमुख लिपिक शिवाजी आघाव,कनिष्ठ लिपिक भाग्यश्री देशमुख,प.ना.सुनील पोहरे,बालक डोंगरे,शिपाई मंगलसिंग सावते,मानसेवी अधिकारी दिपक सूर्यवंशी,प्रेम दामोदर,अशोक इंगळे,राजू खडसे,सुधाकर कराळे यांच्यासह होमगार्ड जवान उपस्थित होते.







