पातूर, दि. ४ सप्टेंबर २०२६ : नगरपरिषद पातूर येथे आज नगरपरिषद संवर्ग अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत संघटनेच्या विविध पदांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.सभेत अध्यक्षपदी श्री. प्रमोद घोडे, उपाध्यक्षपदी श्री. सय्यद अशपाक सय्यद मुस्ताक, कोषाध्यक्षपदी श्री. श्रीकृष्ण शामराव पाटील, तर सचिवपदी श्री. वेदेशसिंग मनोहरसिंग ठाकूर यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. मुदस्सीर एजाज अब्दुल मतीन यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या माध्यमातून नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी नगरपरिषदेचे कार्यालय अधीक्षक सुनील उगले, नगर अभियंता शरद काजळे, रचना सहायक पंकज जोपळे, संगणक अभियंता श्रीकृष्ण बबनराव जैवाळ, लेखापाल रामप्रसाद मस्के, वरिष्ठ लिपिक संतोष तेलंगडे, वरिष्ठ लिपिक विनोद माहुलीकर, वरिष्ठ लिपिक देवेंद्र ढोणे, कर संग्राहक सय्यद जावेद अंजान, सहायक ग्रंथपाल ईश्वर पेंढारकर, ऐनोद्दीन फायजोद्दीन, लिपिक सय्यद सादिक, उज्वल भरणे, आकाश बग्गन व सय्यद अख्तर यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, कर्मचारी हितासाठी ही कार्यकारिणी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.







