पातूरमध्ये श्रद्धांजली सभेत आठवणींना उजाळा; सामूहिक मौन पाळून अभिवादन
पातूर प्रतिनिधी : पातूर येथील ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशमुख यांचे काही दिवसांपूर्वी पुणे येथे निधन झाले,तर अकोला येथील इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रातील पत्रकार कुंदन जाधव यांचेही अकाली निधन झाले.पत्रकारिता क्षेत्रातील दोन सहकाऱ्यांच्या निधनाने पत्रकार बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पातूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने शनिवारी दोन्ही दिवंगत पत्रकारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

स्थानिक डॉ.वंदनाताई जगन्नाथ ढोणे आयुर्वेदिक महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी प्रदीप देशमुख व कुंदन जाधव यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाचा,सामाजिक बांधिलकीचा तसेच त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.


दोन्ही पत्रकारांच्या पत्रकारिता प्रवासातील विविध आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राने संवेदनशील,कर्तव्यनिष्ठ आणि सामाजिक भान जपणारे सहकारी गमावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व पत्रकारांनी सामूहिक मौन पाळून दिवंगत प्रदीप देशमुख व कुंदन जाधव यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे, डॉ.दिगंबर खुरसडे, राजाराम देवकर,मोहन जोशी,प्रदीप काळपांडे,सतीश सरोदे, उमेश देशमुख,अब्दुल कद्दूस भाई,नासीर शेख,नातिक शेख, श्रीकृष्ण शेगोकर,प्रमोद कढोणे,संगीताताई इंगळे,संजय गोतरकर,डॉ.साजिद सर,फरहान अमीन,स्वनिल सुरवाडे,राहुल देशमुख,गोपाल राठोड,भावेश गिरोलकर, किरण निमकडे,निखिल इंगळे,अ.जफर,साजिद हुसेन सर,राम वाढी आदी पत्रकार उपस्थित होते.पत्रकारिता क्षेत्रातील दोन सहकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…!







