पातूर : पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा (स )ﷺ यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद-उन-नबी मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

यावेळी शहरातील विविध भागांमध्ये धार्मिक कार्यक्रम, कुरआन पठण, नात-ए-पाक तसेच दुआचे आयोजन करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत पैगंबर मोहम्मद ﷺ यांच्या शिकवणीचे स्मरण केले.

ईद-ए-मिलादच्या निमित्ताने शहरात बंधुभाव, एकता, शांतता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.विविध ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. नागरिकांनी एकमेकांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.या पवित्र प्रसंगी मानवता,प्रेम,शांतता आणि सामाजिक एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला.







