पातूर प्रतिनिधी : पातूर शहरात ईद-ए-मिलादुन्नबी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला.

यानिमित्त मुस्लिम बांधवांनी आपली वाहने आकर्षक पद्धतीने सजवून जुना बसस्थानक चौक येथून मिरवणूक काढली.मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले. या उत्सवात पातूर शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.मिरवणुकीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपनिरीक्षक खंडारे, उपनिरीक्षक सुहास गोसावी,उपनिरीक्षक अजय वानखडे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडली.
शांतता व सुव्यवस्था राखत ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.







