पातुर प्रतिनिधी:-शिर्ला(अंधारे) येथे श्रीमती.सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७:३० वाजता राष्ट्रगीताने झाली.त्यानंतर महाविद्यालयचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी एकत्र येत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आणि राष्ट्रगीत गायन करण्यात आले.परिसर देशभक्तिपर घोषणांनी आणि देशप्रेमाच्या गजरांनी दुमदुमून गेला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे आणि सचिव हेमलता अंधारे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून श्री.नारायण भाऊ अंधारे, अनंता अंधारे,निलेश हांडे,माजी सैनिक रुस्तम गवई तसेच,वाजीद भाई हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.राम खरडे यांनी मांडले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रशांत भाग्यवंत यांनी केले.महाविद्यालयचे संस्थापक अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी “स्वातंत्र्य हे फक्त इतिहासातील घटना नसून,आजही आपण प्रत्येक क्षेत्रात त्याचे मूल्य जपणे आवश्यक आहे.त्यांनी विद्यार्थ्यांना देशासाठी योगदान देण्यासाठी प्रेरित केले.प्रमुख पाहुण्यांनी आधुनिक शेती, ग्रामीण विकास आणि स्वावलंबन या विषयांवर मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांची रूजवात झाली.स्वातंत्र्य दिन साजरा करताना प्रत्येक उपस्थिताच्या मनात भारताबद्दलची अभिमानाची भावना अधिक दृढ झाली.कार्यक्रमाला कृषि तंत्र निकेतन विद्यालय शिर्ला येथील प्राचार्य मा.चंद्रकांत मोहोड,कार्यक्रम अधिकारी प्रा.केतकी देशमुख,प्रा.पांडुरंग जाधव,प्रा.ओम जाधव,प्रा. शिवकुमार राठोड,प्रा.हर्षल पोरे,प्रा.शुभांगी लव्हारे,सुनीता देशपांडे,अशोक महाल्ले,नितीन वाकोडे,प्रितेश मंजुळकर, अनंत सपकाळ, ऋषिकेश शेंडे,कुलदीप अंधारे,गजानन झाडे,पूजा आवटे,गायत्री राठोड,गौरव शेंडे व विद्यार्थी उपस्थिती उपस्तित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी,प्राचार्य डॉ.राम खरडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.







