पातूर प्रतिनिधी : पातूर शहरात बंजारा समाज बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीज उत्सवाचा समारोप मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात करण्यात आला. यानिमित्त बंजारा समाज बांधवांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढली.

मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. विशेषतः महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत तीज उत्सवातील पारंपरिक गीते व बंजारा नृत्य सादर करून वातावरणात उत्साह निर्माण केला.महिलांच्या पारंपरिक नृत्याने मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृती,रूढी-परंपरा आणि लोककलेचे दर्शन घडविणारा हा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनीही मोठ्या उत्सुकतेने सहभाग घेतला.

मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी पातूर पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे तीज उत्सवाचा समारोप शांततेत पार पडला.







