पातूर प्रतिनिधी : पातूर पोलीस स्टेशनला अकोला जिल्हा अपर पोलीस अधीक्षक श्री.बि चंद्रकांत रेड्डी यांनी भेट देऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.यावेळी पातूर येथील मराठी पत्रकार परिषद संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शहरातील विविध सुरक्षा विषयांवर सविस्तर चर्चा केली.विशेषतः आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील चोरीच्या प्रकरणांबाबत पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांनी अपर पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले.शहरातील संवेदनशील व प्रमुख चेक पॉइंटवर रात्रीच्या वेळी नियमित गस्त वाढविण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.तसेच पातूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्राचा वाढता विस्तार आणि शहरातील वाढत्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांचा विचार करून पातूर पोलीस स्टेशनला अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी,अशी मागणीही यावेळी करण्यात आली.यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत रेड्डी यांनी पत्रकार परिषद पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या व शहरातील सुरक्षा विषयक समस्या जाणून घेतल्या.या भेटीदरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव,मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ पत्रकार मोहनभाऊ जोशी,प्रदीप काळपांडे,उमेश देशमुख,तालुका अध्यक्ष सतीश सरोदे यांच्यासह पत्रकार परिषद संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.







