पातूर : पातूरचे ग्रामदैवत श्री.नानासाहेब महाराज देवस्थानच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही यात्रा महोत्सव होत असून यात्रा महोत्सवाच्या पूर्व तयारीसाठी श्री.नानासाहेब चॅरिटेबल ट्रस्ट व सर्व गावकरी मंडळी परिश्रम घेत आहेत.
पातूरचे ग्रामदैवत श्री.नानासाहेब महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षी उत्साहात करण्यात येते. या यात्रा महोत्सवाचे केवळ पातूर शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात मोठे आकर्षण आहे. या यात्रेस भाविकांसह नागरिकांची मोठी गर्दी असते. हा यात्रा महोत्सव यावर्षी दिनांक २८ जानेवारी २०२६ बुधवार रोजी होणार आहे.सदर यात्रा श्री.रेणुका माता टेकडीच्या मागे स्थित श्री. नानासाहेब महाराज मंदिर येथे होणार असून दुपारी चार वाजतापासून भव्य महाप्रसादास सुरुवात होणार आहे.यात्रेच्या मुहूर्तावर दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पातूर शहरासह तालुक्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात यावे असे आवाहन श्री.नानासाहेब चॅरिटेबल ट्रस्ट, पातूर व गावकऱ्यांनी केले आहे.






