पातुर प्रतिनिधी पातुर तालुक्यातील आदिवासी बहू बहुल भागात तोतया बोगस डॉक्टर हा रुग्णावर उपचार करीत असून या उपचारादरम्यान अनेक आदिवासी बांधवांना लुबाडण्याचा प्रयत्न होत आहे
सविस्तर वृत्ताची आहे की पातुर तालुक्यातील बोडखा, चिंचखेड, माळ राजुरा, कोसगाव, दुधानी, गोंधळवाडी, सावरखेड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज असून सर्व शेतकरी व मजूर वर्ग आहेत या परिसरामध्ये सकाळी व सायंकाळी एक बोगस भामटा डॉक्टर गावात फिरून गावातील रुग्णावर कोणतीही पदवी नसताना फक्त कंपाउंडरचा अनुभव असल्याने रुग्णावर चुकीचा उपचार करून या परिसरातील मजूर वर्गाकडून उपचारादरम्यान मोठ्या प्रमाणात पैसे उकडल्या जातात. प्रत्येक गावात जाऊन एखाद्या भंगार जमा करणाऱ्या सारखा गावात फिरून कुणी रुग्ण आहे का शोध घेऊन त्याच्यावर पोपटासारखा बोलून उपचार करतो या गंभीरघटने कडे तालुका वैद्यकीय अधिकारी हे लक्ष देऊन असून आदिवासी भागातील अनेक रुग्णांचे शोषण होत असून चुकीच्या उपचारामुळे अनेकांना व्यंग आल्याची चर्चा सुद्धा आहे हा तोतया बोगस डॉक्टर पोपटासारखा बोलून डॉक्टर अर्धांग वायू कॅन्सर सारख्या बिमाऱ्या 100% बरा करतो अशा भूलथापा मारून रुग्णावर उपचार करून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळत आहे. या गंभीरघटनेची आदिवासी नेत्यांनी दखल घेतली असून अकोला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पातुर तहसीलदार गटविकास अधिकारी या भामट्या तोतया डॉकटर वर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
अशी आहे शिक्षेची तरतूद
बोगसव्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासनाने महाराष्ट्र अधिनियम १९६१ मधील कलम ३३ ३८ मध्ये सुधारणा केली आहे. अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्याच्या शिक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. हे सर्व गुन्हे दखलपात्र अजामीनपात्र ठरवण्यात आले आहेत. १३ मार्च २००१ पासून हा नवीन कायदा अमलात आला आहे. सुधारित कायद्यात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय करताना पहिल्यांदा आढळून आल्यास शिक्षा ही दोन वर्षांपेक्षा कमी नसून किमान तीन वर्षांपर्यत करण्यात आली आहे.






