सर्वपक्षीय शोकसभा शांततेत व शिस्तीत संपन्न
पातूर | प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर, निर्णायक आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्व.मा.अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पातूर येथे आयोजित करण्यात आलेली सर्वपक्षीय श्रद्धांजली शोकसभा अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.सदर शोकसभा मंगळवार,दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजता पातूर येथील विश्रामगृह येथे पार पडली.या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,स्व.दादांचे चाहते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या राजकीय, सामाजिक व प्रशासकीय कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.स्व.दादा हे केवळ एका पक्षाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व होते,अशा भावना अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.वेळेचे काटेकोर पालन,कठोर निर्णयक्षमता आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अखंड झटणारे निर्भीड नेतृत्व म्हणून स्व.अजितदादांची ओळख कायम स्मरणात राहील,असे मत मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना सभास्थळी सर्वत्र जाणवत होती.यावेळी मा.जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, मा.नगराध्यक्ष हाजी सै.बुऱ्हाण,उपनगराध्यक्ष राजू उगले,सचिन ढोणे,पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश सरोदे,जेष्ठ पत्रकार प्रदीप काळपांडे, रामा अमानकर,विजय सिंह गहलोत,नंदकिशोर राऊत,ठाकूर शिवकुमार बायस,विजय राऊत,राजेश महल्ले,सुधीर सुरवाडे, संदीप तायडे,गणेश गाडगे,छगन कराळे,शेख अन्सार,सचिन बारोकार, राजाराम देवकर,संजय गोतरकर हाफिजउल्ला खान,विठ्ठल लोथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.वरील शोकसभा ही राष्ट्रवादी कॉंग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या अध्यक्षतेत पार पडली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी फरहान अमीन (प्रदेश सचिव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस),कामरूझझ्मा खान (शहर अध्यक्ष) आणि पत्रकार नातीक शेख यांनी परिश्रम घेतले.




