पातुर, प्रतिनिधी : पातुर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत खा उर्फ इद्दू पैलवान यांनी विकास योद्धा मंचाचे उमेदवार सय्यद बुऱ्हाण यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळविला. या चुरशीच्या लढतीत भाजपाचे सचिन ढोणे तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेना (शिंदे गट) उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली.
दि. 20 जून रोजी झालेल्या मतदानानंतर रविवारी मतमोजणी पार पडली. नगराध्यक्षपदासह नगरपरिषदेच्या 20 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. विकास योद्धा मंचालाही 8 जागा मिळाल्या असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 2 आणि भाजपाचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत.
या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ला मोठा धक्का बसला असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपरिषदेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची युती होती, तर विकास योद्धा मंचासोबत राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची आघाडी होती.

निकाल जाहीर होताच पातुर शहरात काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हिदायत खा उर्फ इद्दू पैलवान यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

काँग्रेसचे उमेदवार
शितल प्रवीण पोहरे, मोहम्मद शाकीर मोहम्मद साबीर, सुनिता साहेबराव वाघमारे, साबा अहमद खान अझरखान, सुमया सदर शेख उस्मान ,मोहम्मद मेहता अब्दुल रहुफ ममता राजेश खोडे,
हमीदाबी.
विकास योद्धा मंचाचे
डॉ सय्यद वसीम, बुशरा अंजुम मोहम्मद बाबर, साजिया परवीन मोहम्मद कैसर, कंबर जमा खान आदिल खान, मोहम्मद फैज मोहम्मद मकसूद, शरबत जमीन सय्यद मुजाहिद इकबाल, सय्यद मुजम्मिल हुसेन, साहिस्ता फिरदोस मोहम्मद इरफान
शिवसेना उबाठा
आनंदा रामभाऊ तायडे, अजय गजानन पाटील
भाजपा
अश्विनी सुनील पाटील, तुळसाबाई राजाराम गाडगे






