पातूर, प्रतिनिधी : बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीरामजी सिरस्कार यांच्या जन्मदिनानिमित्त पातूर घाट परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे उत्स्फूर्त स्वागत, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण तसेच भाविकांना फराळ वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी माजी आमदार बळीरामजी सिरस्कार यांच्या सामाजिक व लोकहितवादी कार्याचा गौरव करत त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य व गटनेते श्रीकांतजी ढोणे, गजानन गाडगे, पैलवान संतोष राऊत, सचिन बारोकार, सचिन इंगळे, प्रदीप इंगळे, विलास धोंगडे, गणेश बिलबिले, किरणकुमार निमकंडे, संदीप सौदळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला तसेच पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांना फराळाचे वाटप करून सेवाभावाची परंपरा जपली.






