पातूरमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची दमदार एन्ट्री
शाखा उद्घाटन, कार्यकारिणीची घोषणा आणि नियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात ,खाकी व जनतेच्या सेवेसाठी नवा संकल्प…
पातूर | प्रतिनिधी
“ना जातीसाठी ना पक्षासाठी… आम्ही काम करतो फक्त खाकी व जनतेसाठी…” या ब्रीदवाक्याला साजेसा प्रेरणादायी कार्यक्रम रविवार,दिनांक १२ जुलै २०२६ रोजी पातूर येथे उत्साहात पार पडला.महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना,पातूर तालुका यांच्या शाखा उद्घाटनासह तालुका कार्यकारिणी जाहीर करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष मा.श्री. राहुल (भैया) दुबाले यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यामध्ये प्रमुख उपस्थिती मध्ये विदर्भ अध्यक्ष मा.श्री.आशुतोषभैया चव्हाण,अकोला जिल्हा अध्यक्ष मा. श्री. अक्षय वानखडे, अकोला जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) मा. श्री. सुजित तेलगोटे तसेच अकोला जिल्हा अध्यक्ष (विद्यार्थी आघाडी) मा.श्री.बादलसिंग राठोड यांची उपस्थिती लाभली.पोलीस स्टेशन पातूर परिसरात शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी PSI रमेश खंडारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करत समाजहित,युवक सक्षमीकरण आणि पोलीस-जनता समन्वयासाठी संघटनेने सातत्याने कार्य करावे,असे आवाहन केले.

सदर कार्यक्रम श्री सेवालाल महाराज सामाजिक सभागृह, पातूर येथे तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेची उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्याचा तसेच समाजातील अन्यायग्रस्त,गरजू आणि युवकांच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमास संघटनेचे तालुका अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत,तालुका उपाध्यक्ष अविनाश पोहरे, सचिव पवन तांबे,संघटक गौरव सदार, प्रसिद्धी प्रमुख आशिष शेगोकार,सोशल मीडिया प्रमुख प्रणव उगले,भूषण शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना,पातूर तालुकाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.






