पातूर, प्रतिनिधी…
संभाजीनगर येथे दिनांक ५ जुलै २०२६ रोजी जी चॅम्प अबॅकसतर्फे आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अनुराग सतीश सरोदे याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावून पातूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
स्पर्धेतील यशानंतर संभाजीनगर येथीलच एम.आय.टी. मंथन हॉल येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते अनुरागचा राज्यस्तरीय प्रशस्तीपत्र,मेडल व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.अबॅकस ही अत्यंत कठीण तसेच बुद्धीला चालना देणारी परीक्षा मानली जाते. अशा स्पर्धेत अनुरागने आपल्या मेहनत,चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.अनुरागच्या या यशाबद्दल पातूरसह परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शया यशाचे श्रेय त्याने रामानुजन अबॅकस कोचिंग क्लासेस च्या संचालिका सौ मिताली काळपांडे,विलास काळपांडे,तसेच आई-वडील, बहीण आणि गुरूजनांना दिले आहे.






