पातूर प्रतिनिधी:-
शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी पालकमंत्री बच्चू कडू तसेच अकोला जिल्हा प्रभारी आमदार डॉ.राजेंद्र साळवी यांच्या प्रेरणेने एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अकोला जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर श्रीरंग दादा पिंजरकर यांच्या सह त्रिवेणी वाढदिवसाचे औचित्य साधून पातूर शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १ मध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

हा उपक्रम पातूर पंचायत समितीचे माजी सभापती अनंत उर्फ बालू बगाडे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली व मार्गदर्शनात यशस्वीरित्या पार पडला.वाढदिवसाचा कोणताही अनावश्यक खर्च न करता,समाजातील गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना केवळ साहित्याचे वाटप न करता,भविष्यात उत्तम शिक्षण घेऊन मोठे होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शनही केले.शिक्षणाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.या सामाजिक उपक्रमाच्या वेळी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे पातूर शहरातील किरण कुमार निमकंडे,पुरुषोत्तम भगत,संदिप उमाळे,निलेश बगळेकर,विलास धोंगडे,शाम गाडगे,विलास देवकर,राहुल भगत, डॉ मंगेश चव्हाण,अजय राहुळकर,वासुदेव गवळी, दिनेश बोचरे,दशरथ राऊत शेगोकार,यांच्या सह न.प शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक सौ जोशी मॅडम,झाडोकार सर,यांच्या उपस्थितीत शालेय पुस्तक सत्य वाटप करण्यात आले तर या वेळी सर्व प्रमुख पदाधिकारी,लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनेच्या या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे शिक्षक,पालक आणि स्थानिक नागरिकांमधून कौतुक होत आहे.






