योगाचा प्रसार घरोघरी, गावागावात पोहोचविण्याचा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा संकल्प
पातूर प्रतिनिधी— महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या पातूर तालुका कार्यकारिणीची नुकतीस निवड करण्यात आली आहे
डॉ. एच. एन. सिन्हा महाविद्यालय, पातूर येथे उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.किरण खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पातूर तालुका कार्यकारिणीची अविरोध निवड करण्यात आली.
या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे अमरावती विभाग प्रमुख योगगुरु चंद्रकांत अवचार यांची उपस्थिती लाभली. तसेच प्रा. डॉ. रमेशजी नाकट, महाराष्ट्र योग शिक्षक संघ अकोला जिल्हाध्यक्ष उल्हास मोकळकर, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गावंडे, क्रीडा शिक्षक शिवाजी चव्हाण, ज्येष्ठ नागरिक संघाचे नारायण अंधारे, शिवलाल नाकट यांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेच्या प्रारंभी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या उद्दिष्टे व कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा आधार आहे. योगाचा प्रचार व प्रसार घरोघरी, गावागावात तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.यावेळी सर्वानुमते पातूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.अध्यक्ष विलास फकीराजी राऊत उपाध्यक्ष अ कुद्दुस शेख,कृष्णाराव गाडगे,शालिनी मोकळकर,महासचिव विठ्ठल शंकर लोथे,कोषाध्यक्ष सुभाष भोरे,सचिव प्रा.डॉ.किरण खंडारे,सहसचिव राहुल नाकट,कार्यालयीन सचिव सुरेश पाटील,मीडिया प्रभारी देवानंद गहिले,सोशल मीडिया प्रभारी प्रा.मुकुंद कवडकरमहिला प्रकोष्ठ प्रभारी प्रा.डॉ.ममता इंगोले,
महिला सदस्य प्रा.डॉ.दिपाली घोगरे,वैशाली निकम
तसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून रामदास मोकळकर, शिवलाल नकट,अतुल विखे, नारायण अंधारे,रामेश्वर बर्डे, दत्तात्रय बर्डेप्रशांत निकम,सूर्यकांत जोशी,प्रा. अरविंद भोंगळे, प्रा.राम घायाळकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी योगगुरु चंद्रकांत अवचार यांनी योग चळवळीचे महत्त्व, संघटनेची भूमिका आणि समाजाच्या आरोग्यासाठी योगाचा प्रसार करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
सभेचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघ अकोला जिल्हाध्यक्ष उल्हास मोकळकर यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.ममता इंगोले यांनी,तर आभार प्रदर्शन प्रा. अरविंद भोंगडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विशाल सुरपाम तसेच महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे पातूर तालुक्यात योग चळवळीला नवी दिशा मिळणार असून,निरोगी व सुदृढ समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघाच्या माध्यमातून व्यापक कार्य घडणार आहे.







