पातूर : अकोला-वाशिम महामार्गावर प्रमोद कढोणे यांच्या मळ्यात पुरातन असे श्री.कर्पूपुरेश्वर महादेव मंदिर असून पातूर शहरातील श्री.कवळेश्वर मंदिरानंतर दुसरे आराध्य दैवत असून भाविकांची मांदियाळी येथे असते.सालाबादाप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री निमित्ताने श्री.कर्पूपुरेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजीमहाशिवरात्रीनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई मारोती कढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ६:०० वाजता पूजनाला सुरुवात झाली. गणपती पूजन पुण्याह वाचन मातृका पूजन,सर्वतोभद्र मंडल स्थापन,नवग्रह पूजन,रुद्र देवता पूजन,रुद्रेश्वर महादेवाला रुद्र अभिषेक,मंडळ देवता हवनपूर्णाहूती नंतर महाआरती झाली.यावेळी मंदिराचे विश्वस्त प्रमोद कढोणे व वृषाली कढोणे यांनी सपत्नीक पूजा केली व त्यानंतर साबुदाण्याच्या खिचडीच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले असून तब्बल अडीच क्विंटल साबुदाण्याच्या खिचडीचे वितरण करण्यात आले असून पातूर शहरासह आजूबाजूच्या ग्रामस्थांनी देखील या प्रसादाचा लाभ घेतला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रमोद कढोणे,अमोल सोनोने,प्रदीप काळपांडे,संजय बंड,स्वप्निल सुरवाडे,दामोदर जटाळे,मुकेश खंडारे,भगवान काळपांडे,राजू खंडारे,सागर बोंबटकार,सुरेश काळपांडे यांनी परिश्रम घेतले तसेच भावना पब्लिक स्कुल,खानापूर रोड पातूर यांचे विशेष सहकार्य लाभले.






