शिवजयंती निमित्त शब्दातून दुमदुमला स्वराज्याचा जयघोष…..
पातुर -(प्रतिनिधी )- नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरायांना विचारांची जयंती समर्पित करण्याच्या उद्देशाने "शिवनाद स्वराज्याचा उद्घोष" या भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ पातुरच्या वतीने करण्यात आले होते.या वक्तृत्व स्पर्धेमध्ये संकल्प शंकर गाडगे यांने आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला असून संकल्पलि ट्रॉफी,प्रशस्तीपत्र व रोख 3000 हजार रुपयाचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित या वकृत्व स्पर्धेमध्ये "छत्रपती शिवाजी महाराजांची स्त्रियांविषयीची भूमिका " या विषयावर आपले विचार मांडताना संकल्पने छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रियांबद्दल असलेला आदर तसेच आजच्याआधुनिक काळाला शिवरायांचे विचारायची असलेली गरज हे संकल्पने विविध उदाहरण दाखले देऊन आपल्या वक्तृत्वातून प्रेक्षकांसमोर मांडले व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. या स्पर्धेकरिता बहुसंख्य स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेला परीक्षक म्हणून इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा.अरविंद भोंगळे सर,प्रा.उज्वला मनवर मॅडम, युवा पुरस्कार विजेते श्री.विशाल राखोडे सर,श्री मुखाडे सर आदीनी निपक्षपाती परीक्षण केले.शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेले बहुसंख्य शिवभक्त या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.






