पातुर प्रतिनिधी पातुर तालुक्यातील शिरला ग्रामपंचायतच्या सचिवाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून युवा सेना जिल्हाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी पातुर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालनात 27 फेब्रुवारी रोजी ठिया आंदोलन करण्यात आले या

आंदोलनामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता शिरला ग्रामपंचायत ची सचिव यांचा मनमानी कारभार,प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार,नागरिकांशी असभ्य वर्तणूक,मोठ्या प्रमाणात खोळंबली कामे या विरोधात आज शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले आंदोलनाची उग्रता पाहता गटविकास अधिकारी यांनी नागरिकांच्या सर्व तक्रारी ऐकून घेऊन संबंधित सचिवावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.व आठ दिवसात योग्य कारवाई न केल्यास अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे या आंदोलना दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त उपस्थित होता यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सागर रामेकर,विशाल तेजवाल,शिवसेना उपतालुका प्रमुख रामेश्वर बेलूरकर,शाखा प्रमुख विठोबा ढाळे ,सचिन गिऱ्हे, प्रविण पोहरे,गणेश राहुलकर,रामू ढगे,सुनिल हजारे,श्याम ठाकरे,राहुल गवई,प्रशिक शिरसाठ, बबिता तायडे,छाया पोहरे,द्रौपडाबाई वानखडे,अजिंक्य बोरकर, मधुकर पोहरे,संगीता गिऱ्हे,रंजना सोनोने,प्रमिला वानखडे सह असंख्य नागरिक उपस्थित होते






