संत नगरी शेगाव येथे ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयाचा आरोग्य मेळावा
प्रतिनिधी पातुर:- संत नगरी शेगाव येथे ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालयाचा आरोग्य मेळावा संपन्न झाला.हजार पेक्षा अधिक रुग्णांना पंचकर्म सेवा तर पाचशे पेक्षा जास्तीत जास्त नागरिकांना मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.

शेगाव (जि. बुलढाणा) आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळावा सन २०२६ संत नगरी शेगाव येथे अत्यंत उत्साहात आनंदात पार पडला.या ऐतिहासिक मेळाव्याला माननीय महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,माननीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव,माननीय सचिव राजेश कोटीचा,भारतीय चिकित्सा पद्धतीच्या अध्यक्षा डॉ.मनीषा कोठेकर तसेच आयोजक डॉ.आशुतोष गुप्ता व डॉ.दत्ता पाटील यांची उपस्थिती लाभली.माननीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या आदेशाने व संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.डॉ.वंदनाताई जगन्नाथ ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय,पातूर यांच्या वतीने भव्य पंचकर्म सेवा केंद्र उभारण्यात आले होते.
चार दिवस अखंड रुग्णसेवा पंचकर्म विभाग प्रमुख डॉ.अरुण राठी यांनी सलग चार दिवस स्वतः मैदानात उतरून अविरत परिश्रम घेतले.सकाळपासून सायंकाळपर्यंत हजारो रुग्णांची तपासणी, मार्गदर्शन व उपचार यामध्ये त्यांनी नेतृत्व केले.त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे पंचकर्म सेवा केंद्र अत्यंत शिस्तबद्ध व परिणामकारकपणे चालविण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची विशेष दखल घेत प्रशंसा केली.एक हजार रुग्णांना मोफत पंचकर्म सेवा
महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त रुग्णांनी मोफत पंचकर्म उपचारांचा लाभ घेतला.आयुर्वेदाच्या शास्त्रीय उपचारपद्धतीमुळे रुग्णांमध्ये समाधान व सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.महाविद्यालयाच्या वतीने आयोजित नेत्रतपासणी शिबिरात ५०० पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही सेवा अत्यंत लाभदायक ठरली आयुर्वेद विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रबोधनपर व्याख्यान
आरोग्य मेळावा २०२६ मध्ये आयुर्वेद विद्यार्थी व आयुर्वेद चिकित्सकांसाठी विशेष प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.देशातील विविध आयुर्वेद महाविद्यालयांचे शिक्षक,विद्यार्थी,आयुर्वेदिक वैद्य व खाजगी वैद्य यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. त्यांच्या वैज्ञानिक मांडणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.डॉक्टर व विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग होता या उपक्रमात खालील डॉक्टरांनी सातत्याने सेवा दिली.डॉ.संजीव राठोड डॉ.वर्षा देसाई डॉ.अभिषेक मुळे डॉ.चंद्रविजय भोयरे (पंचकर्म विभाग)डॉ.भुजबळे डॉ.आश्विनी चौधरी डॉ.अजय वरेकर डॉ.अश्विनी दिंडोकार डॉ.कल्याणी घाटे डॉ.अभिनय मुळे अजमत खान महाविद्यालयाचे संचालक डॉ.साजिद शेख व प्राचार्य डॉ.अभय भुस्कळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीमने उत्कृष्ट समन्वय साधला.तसेच डॉ.काटोले,डॉ.विजय कवडे,धनंजय मिश्रा,शुभम राठोड,आशा सावरकर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.
समाजसेवेचा आदर्श नमुना राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६ मध्ये ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय,पातूर यांनी केलेली ही व्यापक व समर्पित रुग्णसेवा आयुर्वेदाच्या प्रसारासाठी मोलाची ठरली असून समाजात आरोग्यजागृतीस चालना देणारी ठरली आहे.
ही कामगिरी केवळ संस्थेचा गौरव नसून संपूर्ण विदर्भासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.






