पातूर प्रतिनिधी बाळापुर मतदार संघाची आमदार तथा उपनेते श्री नितीन देशमुख यांच्या निष्ठावान पदाधिकाऱ्यांची छोटी खाणी बैठक बाभूळ बनात संपन्न झाली असून या बैठकीमध्ये येणाऱ्या निवडणुकीत पातुर नगरपरिषद, शिरला ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेवर सत्ताधाऱ्यांना धूळ चाटून विजय संपादन करण्याची आखणी करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या काही दिवसापासून गटातटाच्या राजकारणात एकमेकांना संपविण्याचे कट कारस्थान करणारे , वृक्ष लागवड भ्रष्टाचार, खोट्या खऱ्या तक्रारीवरून झालेला त्रास, रोजगार सेवकाची नवीन भरती, पंचायत समिती निवडणुकीत पराभवाचे खापर, नगरपरिषद निवडणूक झालेला अपमान, कामे मिळवण्यासाठी झालेली धडपड अशा अनेक घडामोडीला तीतांजली देऊन आज या बैठकीत सर्व मतभेद विसरून एका ठिकाणी बसून येणाऱ्या निवडणुकीत विजय प्राप्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. या बैठकीचे फोटो सोशल मीडियावर टाकून एकीचे प्रदर्शन करून सत्ताधाऱ्यांना यावेळी तुमचा पराभव निश्चित असल्याचे संकेत देण्यात आले आहे. या बैठकीमध्ये नगरपरिषद वर आघाडीचा नगराध्यक्ष व शिरला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती गणावर शिवसेनेचा भगवा फडकेल असा आशावाद यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला






