चान्नी :- पोलीस स्टेशन चान्नी येथे दि.०७ एप्रिल २०२६ रोजी अकोला जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी यांनी वार्षिक निरीक्षणासाठी भेट दिली.

यावेळी सर्वप्रथम पोलीस स्टेशन परिसरातील पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत परिसरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यात आला तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण कसे आणता येईल,गुन्हा घडताच त्यावर तत्काळ व योग्य उपाययोजना कशा कराव्यात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित कशी ठेवावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यानंतर पोलीस अधिकारी व अंमलदारांसाठी कायदा व सुव्यवस्था संदर्भात पोलीस कवायत,शस्त्र कवायत तसेच मोब लॉन्चिंग संदर्भातील सराव घेण्यात आला.पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सामान्य नागरिकांना कायदा व सुव्यवस्था विषयक माहिती देऊन निर्भयपणे जीवन जगण्यासाठी आवश्यक बाबींवरही बी.चंद्रकांत रेड्डी यांनी मार्गदर्शन केले.तसेच नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी व गुन्हे समजून घेऊन त्या तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.या वार्षिक निरीक्षणावेळी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र लांडे, दुय्यम अधिकारी,पोलीस अंमलदार,पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस उपस्थित होते.







