अकोला (प्रतिनिधी) – शिवसेनेतील निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले श्री. मुकेश भाऊ मुरूमकार यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून अकोला जिल्ह्यातील अकोट व मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती मुंबई येथील ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुख श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी शिवसेना नेते खा. अरविंदजी सावंत, उपनेते आ. नितीन बाप्पू देशमुख तसेच संपर्क प्रमुख शिरवाडकर साहेब यांच्या उपस्थितीत मुरूमकार यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या नियुक्तीसाठी जिल्हाप्रमुख गोपाल भाऊ दातकर, माजी आमदार दाळू गुरुजी, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार संजय भाऊ गावंडे तसेच सर्व उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख व सर्कल प्रमुख यांनी एकमताने सहमती दर्शवली.
मुकेश मुरूमकार यांच्या नियुक्तीमुळे अकोला जिल्हा शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल मुकेश भाऊ मुरूमकार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







