अकोला (प्रतिनिधी) – अकोला येथील सर्व कुंभार समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दि. १५ एप्रिल २०२६ रोजी श्री संत गोरोबा काका मंदिर, गजानन नगर, डाबकी रोड, अकोला येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता होणार असून, महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषद, अकोला चे अध्यक्ष श्री रामकृष्ण नथ्थुजी साविकर यांच्या हस्ते मुर्तीपूजन व तीर्थस्थापना करण्यात येणार आहे.
त्यानंतर दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. महंत श्री श्री १००८ स्वामी सुरेश्वरानंदजी गिरी (रा. कृष्णाई गोरक्षण, आंबोडा ता. अकोट) यांच्या मधुर वाणीतून हरिकीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याच दिवशी दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पवित्र सोहळ्यात सर्व कुंभार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषद, अकोला तसेच श्री संत गोरोबा काका सामाजिक कार्यकारी मंडळ, अकोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या आयोजनासाठी समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते—किशोर कापडे, तुळशिदास लोकार, रामदास गाडेकर, योगेश इंगळे, राम मेहरे, सुनिल साविकर, संतोष सरोदे, गणेश पासुळकर, रामदास सरोदे, अरुण सौदागर, रामकृष्ण वाडकर, रमेश कोल्हे, रवि पोहनकर, प्रा. रोहित हिवरकर, प्रा. दिलीप अप्तुरकर, अमोल प्रजापती, रमेश वनकर, राजेश साविकर, प्रदीप लोलुरे, लखन घाटोळे, रामचंद्र मेहरे, रमेश रेवेकर, धनराज सोनोने आदींनी पुढाकार घेतला आहे.






