पातूर (प्रतिनिधी) – आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने पातूर व बाळापूर तालुक्यातील पाटील समाज बांधवांची बैठक उत्साहात पार पडली. अल्प सूचनेवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला तब्बल साठहून अधिक बांधवांची उपस्थिती लाभली, त्यामुळे समाजातील एकजुटीचे दर्शन घडले.
बैठकीत सुरुवातीला पाटील समाजाच्या पुढील वाटचालीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. समाज म्हणून एकत्रितपणे कोणती दिशा घ्यावी, यावर साधक-बाधक विचारमंथन झाले. चर्चेअंती पातूर व बाळापूर या दोन्ही तालुक्यांसाठी संयुक्त पाटील समाज संघटना/समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
या नव्या संघटनेच्या माध्यमातून शेती, शिक्षण, आरोग्य, उद्योजकता आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये ठोस काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच संघटनेची घटना तयार करून पुढील बैठकीत त्यावर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी टाईम टेबल तयार करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुढील बैठक 23 एप्रिल 2026 रोजी वाडेगाव येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले असून, या बैठकीत संघटनेला अधिकृत स्वरूप देण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
या बैठकीस कृष्णा भाऊ अंधारे, माणिकरावजी भरणे, रमेश पाटील भगत, विजय पाटील टाले, प्रशांत पाटील मानकर, पुरुषोत्तम पाटील मांगटे, हिम्मतरावजी मेटांगे, बंडू पाटील माळी, दीपक पाटील पोहरे, रवि लांडे, विपुलजी ठाकरे, आकाशजी दांदळे, संजय पाटील होनाळे, अशोक पाटील नळकांडे, सहदेवरावजी ठाकरे, गणेश पाटील माळी, मंगेश पाटील भरणे, योगेश पाटील ढोरे, रवी पाटील गावंडे, प्रा. विठ्ठलराव मेटांगे, प्रशांत मानकर, रामा पाटील अमानकर, दिगंबर पाटील, योगेश पाटील महल्ले, बाळासाहेब तायडे, सुनिताताई अशोक ताथोड, ज्ञानेश्वर ताले, सहदेव तेजराव पाटील, मधुकर शालिग्राम निमकाळे, दीपक शेषराव गावंडे, रामेश्वर विश्वनाथ ताले, संदीप पाटील, विजय विश्राम वाघ, गणेश शंकर लांडे, पत्रकार राजू हरिश्चंद्र लांडे, सुभाष म्हैसने, सौ. मंगला म्हैसणे, संजय बढे यांच्यासह इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमुळे पाटील समाजाच्या संघटनात्मक बळकटीकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, आगामी काळात समाजहिताच्या विविध उपक्रमांना गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






