पातूर (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी पातूर शहर मंडळाच्या वतीने अकोला पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा विधानसभा मुख्य प्रतोद रणधीरभाऊ सावरकर यांचा जन्मदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी पातूर शहर मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आमदार रणधीरभाऊ सावरकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.







