पातुर (प्रतिनिधी):
गोमातेला सन्मान मिळावा तसेच तिला “राष्ट्रमाता”चा दर्जा मिळावा या मागणीसाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पातुर येथे गोमाता सन्मान अभियानाची पूर्व नियोजन बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक संत श्री सिदाजी महाराज मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
बैठकीदरम्यान गोमाता सन्मान अभियानांतर्गत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून आगामी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच अभियानासाठी आवश्यक असलेल्या पूर्वपरवानगीकरिता माननीय तहसीलदार तथा ठाणेदार, पातुर यांना निवेदनही देण्यात आले.
या अभियानाच्या अनुषंगाने दिनांक 27 एप्रिल 2026 (सोमवार) रोजी सकाळी 9 वाजता संत श्री सिदाजी महाराज सभा मंडप येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व जागरूक देशभक्त व गोभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस संजुभाऊ यादव, संजय गाडगे, सचिनभाऊ बारोकार, नानासाहेब देशमुख, श्री श्री 108 श्री महंत गणेशानंदगिरी महाराज, श्री नवनाथ महाराज गोशाळा चॅरिटेबल ट्रस्ट पातुरचे प्रतिनिधी, अनंता बगाडे (बालुभाऊ), राजुभाऊ उगले, सुभाष हिरळकर, नंदकिशोर आमले, डॉ. श्रीकांत बोरकर (वनराई गोरक्षण), अशोक उगले आदी मान्यवर उपस्थित होते.






