पातूर : महाराष्ट्र राज्य भारत स्काउटस आणि गाईडस राज्य संस्था मुंबई अंतर्गत घेण्यात येणाऱ्या राज्य पुरस्कार चाचणीमध्ये पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव होणार आहे.महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी चाचणी परीक्षा घेण्यात येत असते नुकतीच ही परीक्षा पार पडली असून यामध्ये पातुर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या तन्मय माहोकार आणि रुद्रेश पवार या दोन स्काउटनी सहभाग घेतला होता.यामध्ये त्यांची प्रवेश,प्रथम सोपान. द्वितीय सोपान,तृतीय सोपान तसेच राज्य पुरस्कार या तीन वर्षीय अभ्यासक्रमावर आधारित लेखी तसेच प्रात्यक्षिक चाचण्या दिल्या.या परीक्षेत किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या तन्मय माहोकर,रुद्रेश पवार या विद्यार्थांनी प्रविण्य मिळवत बाजी मारली.या विद्यार्थ्यांनाशाळेचे स्काउट मास्टर अविनाश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,कार्यकारी संचालीका सौ.ज्योत्स्ना गाडगे,मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे यांनी सत्कार केला.






