📍 अकोला, मेराज सिनेमा येथे
१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अकोल्यात युवासेनेच्या वतीने एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या प्रेरणेतून, खासदार Shrikant Shinde यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष Purvesh Sarnaik यांच्या संकल्पनेतून “राजा शिवाजी” या चित्रपटाचा भव्य विशेष शो आयोजित करण्यात आला आहे.
हा विशेष शो १ मे रोजी दुपारी ३ वाजता अकोल्यातील मेराज सिनेमा (मूर्तिजापूर रोड) येथे होणार असून, या माध्यमातून Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
युवासेनेच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तरुणाईमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण होईल, तसेच शिवरायांच्या विचारांनी समाज भारावून जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
“जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना अकोला जिल्हा पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे. 🚩






