राज्यातील सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक माणिकराव भंडगे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी द्यावी,अशी जोरदार मागणी विविध स्तरांतून होत आहे. यासंदर्भात मा.उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याकडे विनंती करण्यात आली आहे.
माणिकराव भंडगे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय सहभाग घेत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे. त्यांच्या प्रामाणिक,निःस्वार्थी व दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे त्यांनी जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे.विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रमांमुळे त्यांनी समाजाच्या सर्व स्तरांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे,राज्यातील होमगार्ड दलाच्या समस्यांबाबत त्यांनी घेतलेली पुढाकार ही अत्यंत उल्लेखनीय मानली जाते. सुमारे ४७ हजार होमगार्ड जवानांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यामुळे ते या घटकासाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात.
तसेच, वंचित व मागास घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. विशेषतः भोईर समाजाला अद्याप विधानसभेत किंवा विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळालेले नसल्याने,या समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी भंडगे यांना संधी देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
राज्यातील सुमारे ३० विधानसभा मतदारसंघांमध्ये होलार समाजाचा प्रभाव असून,त्यांच्या मतांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळवण्यात महत्त्वाची मदत झाली आहे.याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते खा.स्व.अजितदादा पवार व स्व.आर.आर.पाटील यांनीही पूर्वी जाहीर सभांमध्ये मान्य केले असल्याचे सांगितले जाते.मानिकराव भंडगे यांचे नेतृत्वगुण,कार्यतत्परता आणि जनसंपर्क,कौशल्य लक्षात घेता,ते विधान परिषदेसाठी एक सक्षम व प्रभावी उमेदवार ठरतील,असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान,मा.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.त्यांच्या उमेदवारीमुळे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळेल आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल,असे मत नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.






