दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उत्कृष्ट यशाची परंपरा कायम…
पातुर (प्रतिनिधी ) – नुकतेच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे चा वर्ग 12 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर चा निकाल 100 % लागला असून यावर्षी सुद्धा महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातुर मधून एकूण 83 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते, यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.महाविद्यालया मधून कु.साक्षी अमर वानखेडे हिने 85.17 % गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे तसेच यश विनोद चव्हाण यांनी 77.80 % गुण प्राप्त करून महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे व कुमारी आरती सुरेंद्र तायडे हिने 75.84% गुण प्राप्त करून महाविद्यालयातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण 03 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 50 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तसेच 27 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
महाविद्यालयाच्या या उत्कृष्ट यशाबद्दल संस्थेचे संस्थापक/ सचिव मा. श्री रामसिंगजी जाधव साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्राचार्या सौ.मीरा ढोकणे मॅडम व सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.






