भारत सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड साठी प्रकल्पाची निवड
भारत सरकार तर्फे विद्यार्थ्याला दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य
पातूर प्रतिनिधी : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘इन्स्पायर अवॉर्ड्स – मानक’ २०२५-२६ साठी पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याच्या प्रकल्पाची निवड झाली आहे.इयत्ता दहावीत शिकत असलेल्या प्रणव विशाल कांबळे याने ए आय मॉड्युल विकसित करीत “सेल्फ चार्जिंग बाईक” हा प्रकल्प तयार केला होता. या प्रकल्पाचे त्याने इन्सापयर साठी नामांकन दखल केले या अभिनव प्रकल्पाची दखल भारत सरकारच्या इन्स्पायर अवॉर्ड मानक समितीने घेतली असून त्याला इन्स्पायर अवॉर्ड साठी नामांकन मिळाले आहे.किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या प्रणव कांबळे याला आपला वैज्ञानिक प्रकल्प किंवा ‘प्रोटोटाइप’ वर्किंग मॉड्युल विकसित करण्यासाठी दहा हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर झाले आहेत. हा प्रकल्प अधिक विकसित केल्यानंतर पुढील प्रदर्शनीमध्ये मांडला जाणार आहे.त्यासाठी प्रणव अथक परिश्रम घेत आहे.या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे,शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे,विज्ञान शिक्षक हरिष सौंदळे यांच्यासह शिक्षकांनी प्रणव चा सत्कार केला.किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलने विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे आणि हे यश शाळेसाठी अभिमानास्पद आहे,अशी भावना पालक व्यक्त करीत आहेत.






