पातुर : शहरातील भक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक केंद्र म्हणून उभ्या राहिलेल्या स्वामी समर्थ साधना केंद्राच्या सभागृहाचे उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा आज उत्साहात पार पडला. या सभागृहासाठी आमदार नितीन देशमुख यांनी तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

या निधीतून उभारण्यात आलेले भव्य सभागृह आता भक्तांसाठी खुले झाले असून, उद्घाटन प्रसंगी स्वामी समर्थांच्या पादुकांचे आमदार नितीन देशमुख यांनी सहपत्नी प्रांजलीताई देशमुख यांच्या हस्ते विधिवत अभिषेक करण्यात आला. धार्मिक वातावरणात मंत्रोच्चार, पूजा-अर्चा आणि प्राणप्रतिष्ठा विधी पार पडला.
या कार्यक्रमाला शहरातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.

या सभागृहामुळे पातुर परिसरातील भक्तांना साधना, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी एक सुसज्ज ठिकाण उपलब्ध झाले आहे. कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.






