पातूर | ८ मे २०२६
पातूर तालुक्यातील सावरगाव येथे १० वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या घटनेचा विविध स्तरांतून निषेध नोंदविला जात असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबीयांना धीर देत न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,असा विश्वास देण्यात आला.

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.यावेळी खासदार अनुप दादा धोत्रे,माजी आमदार बळीराम शिरस्कार,भिकाभाऊ धोत्रे,रमणजी जैन,प्रेमानंद श्रीरामे,गजानन निमकाळे,राजू उगले,सचिन ढोणे,सचिन बायस, दीपक डोंगे,नवीन करंगळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






