दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा उत्कृष्ट यशाची परंपरा कायम…
पातुर (प्रतिनिधी ) – नुकतेच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ पुणे चा वर्ग 10 वीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विद्यालय पातुर चा 84.21 % निकाल लागला असून यावर्षी सुद्धा विद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे.वसंतराव नाईक विद्यालया मधून कु. प्रतीक्षा दिनेश तायडे हिने 90. 00 % गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला,तसेच कु. रोशनी सुनील उपर्वट हिने 88.80 % गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला व कु.चैताली विनोद वडतकार हिने ८३.२० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.या विद्यालया मधून एकूण 10 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून 14 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तसेच 08 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयाच्या या उत्कृष्ट यशाबद्दल संस्थेचे संस्थापक/ सचिव मा.श्री रामसिंगजी जाधव साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्राचार्या सौ.मीरा ढोकणे मॅडम व सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभिनंदन केले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.






