अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बु.येथे मन नदीत बुडून शिवसैनिक दिलीप मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.दिलीप मुंडे हे निष्ठावान शिवसैनिक म्हणून परिसरात परिचित होते.त्यांच्या निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दि. ८ मे २०२६ रोजी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ही माहिती महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.माहिती मिळताच शिंदे साहेबांनी कोणताही विलंब न करता मुंडे कुटुंबीयांना तात्काळ रोख १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली.

यावेळी शिवसेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख मा.आ.राजन साळवी,मा.आ.जिल्हाप्रमुख नारायण गव्हाणकर,जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, शिवसेना जिल्हा समन्वयक प्रणव तायडे पाटील तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशिवाय दिलीप मुंडे यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठीही मदत करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिली. शिंदे साहेबांच्या या मदतीमुळे मुंडे कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला असून परिसरातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.






