पातूर शहरातील गोरक्षक तथा माजी शिवसेना शहर प्रमुख संजय यादव यांनी पुन्हा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. हिंदुत्ववादी विचारसरणी आणि गोरक्षणासाठी सातत्याने कार्य करणारे संजय यादव यांनी अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संजय यादव यांनी शेकडो गोधनांना जीवदान दिले असून काही वर्षांपूर्वी पातूर घाटामध्ये सुरू असलेल्या गोधनाच्या हाडांच्या कारखान्याचा पर्दाफाश करून संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच लव्ह जिहाद, गोरक्षण व हिंदुत्ववादी विचारांवर आधारित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी समाजामध्ये जनजागृती केली. पातुर येथील सदन कास्तकार प्रतिष्ठित नागरिक पातुर शहरातील पाटील मंडळी परिसरात राहणारे अरुण पाटील यांना मागील निवडणुकीत जो अनुभव आला त्यावरून त्यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे विचार पाहून शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला
यावेळी बोलताना संजय यादव यांनी, राज्याचे शिवसेना अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मान . श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात कार्य करण्याचा मानस व्यक्त केला.
हा जाहीर प्रवेश शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार राजन साळवी, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख नारायण गव्हाणकर, पांडे गुरुजी, उमेश अप्पा भुसारी, जिल्हा समन्वयक प्रणव तायडे, तालुकाप्रमुख बालुभाऊ बगाडे, डॉ. सुनील आवटे, निलेश कापकर, छत्रपती गाडगे यांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रवेशामुळे पातूर तालुक्यात शिवसेनेला आणखी बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.






