पातूर प्रतिनिधी : पातूर नगर परिषद सभागृह येथे सार्वत्रिक निवडणूक 2026 संदर्भात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.नगर परिषद निवडणूक जाहीर झाल्याने नागरिकांना तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी ही सभा 15 मे रोजी नगर परिषद पातुर सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला बाळापूर उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संतोष येवलेकर प्रमुख उपस्थित होते.त्यांनी पातूर शहरातील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सार्वत्रिक निवडणूक 2026 संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी आदर्श आचारसंहितेचे नियम काटेकोरपणे पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच पातूर तहसील निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार अजय तेलगोटे,पातूर नगर परिषद मुख्याधिकारी अक्षय गडलिंग यांनीही उपस्थित राहून नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
या सभेला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,पातूर शहरातील नागरिक,पत्रकार बांधव,तसेच माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; module:1facing:0; hw-remosaic: 0; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: Night; cct_value: 0; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 0.0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0;






