सात विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र
पातूर प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा घेण्यात येत असते. यावर्षी इयत्ता चौथी,पाचवी व सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती.यामध्ये पाचवी आणि आठवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.यामध्ये पातुर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या सात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.यामध्ये इयत्ता पाचवी मधून अन्वी इंगळे,अर्णव निमकाळे,किमया सावत,लावण्या गाडगे,तन्वी लठाड तर इयत्ता आठवी मधून अजहफ खान, सोनम मेहरे आदी विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवत शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत.त्यांच्या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे,मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे यांनी पात्र विद्यार्थ्यांचे शुभेच्छा देऊन कौतुक केले.यावेळी शाळेचे शिक्षक नरेंद्र बोरकर,चंद्रमणी धाडसे,नितु ढोणे,इकरा आदिबा खान,शुभांगी बोरकर आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.






