📍 पातूर | प्रतिनिधी
गोपनीय माहितीच्या आधारे बाळापूर येथील सरकारी दवाखान्याजवळ लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवंश व वाहने असा एकूण ९ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पहिल्या कारवाईत प्रमोद उमेश गावंडे (वय ३१, रा. बाभुळगाव ता. पातूर) व मोहम्मद सलीम शेख मजीद (वय ४८, रा. वाडेगाव ता. बाळापूर) यांच्या ताब्यातून तीन गोवंश जप्त करण्यात आले. यामध्ये विविध रंगांचे व वर्णनाचे बैल असून त्यांची अंदाजे किंमत ५५ हजार रुपये आहे. तसेच एमएच ३० एबी १९६३ क्रमांकाची जुनी बुलेरो पिकअप किंमत अंदाजे ४ लाख रुपये असा एकूण ४ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत मोहम्मद नजीम शेख अकील (वय ३२, रा. जमदार प्लॉट, पातूर) याच्या ताब्यातून चार बैल जप्त करण्यात आले. या गोवंशाची अंदाजे किंमत ९५ हजार रुपये असून एमएच ०४ डीएस ६५६७ क्रमांकाची बुलेरो पिकअप किंमत अंदाजे ४ लाख रुपये असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ९ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक शरद सैंदाणे, पोलीस उपनिरीक्षक वैशाली पाटील, पोहेकॉ सोहेल खान, पोकॉ शुभम गई, पोकॉ सुमित क्षीरसागर व पोकॉ संदीप पेड यांच्या पथकाने केली.






