येत्या सात जून रोजी वाशिम शहरात सावता परिषदेच्या वतीने जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून. यात महाराष्ट्रातील सावता परिषदेचे व ओबीसीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून जनगणना व ओबीसी या विषयावर सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय जनगणना परिषदेचे आयोजन सावता परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

या जनगणना परिषदेच्या आयोजनासाठी रविवार दिनांक 24/5/2026 वाशीम,अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची नियोजनाची बैठक विश्रामगृह वाशिम येथे पार पडली. यात विविध विषयावर चर्चा करून ही परिषद यशस्वी करण्यासाठी सांगोपांग चर्चा करण्यात आली. ही बैठक सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली सावता परिषदेचे प्रदेश सहसचिव प्रवीण भाऊ वाघमारे,प्रदेश उपाध्यक्ष रविभाऊ भांदुर्गे अकोला जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव जी निखाडे, खामगाव जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जावळकर वाशिम जिल्हा अध्यक्ष विलास ढगे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रंजनाताई परिसकर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शेखर जटाळे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष रविभाऊ वानखेडे वाशिम शहराध्यक्ष चेतन इंगोले, पातुर तालुका अध्यक्ष अजय ढोणे अकोला जिल्हा उपाध्यक्ष छोटू भाऊ काळपांडे वाशिम तालुका अध्यक्ष बाळूभाऊ माल, खामगाव येथून अमोल धामणकर, अमोल चरखे,गजानन उठाळे मंगरूळपीर तालुका अध्यक्ष चेतन शिंदे रिसोड महिला आघाडी शहराध्यक्ष रेखाताई जहीरव रिसोड महिला आघाडी तालुका अध्यक्ष,दिपाली ताई काळे, अकोला महानगर अध्यक्ष दिनेश जी सोळंके,मंगलाताई भांदुर्गे, शितल जाधव,ज्योती जाधव,नीता जाधव,वंदना वानखडे, सुनिता पुंड, ज्योति इरतकर,अपर्णा सोनवणे,गोदावरी रतकर, गीता भांदुर्गे, ज्योती सोनवणे,शोभा इरतकर, वंदना भांदुर्गे ,सह तिन्ही जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सावता परिषदेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते सर्व यावेळी सर्वानुमते सात जून ची जनगणना परिषद यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी गजानन ठेंगडे,अमोल गाभणे, सुनील वानखेडे,आकाश गायकवाड, रवी खोटे,यांना सावता परिषदेत प्रवेश देण्यात आला
जनगणना परिषद साठी पातूर तालुक्यातील obc बांधवांनी या कार्यक्रमा साठी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सावता परिषद पातुर तालुका अध्यक्ष अजय ढोणे यांनी केले आहे






