पातूर तालुका प्रतिनिधी : पातुर येथील भारतीय जनता पार्टीच्या नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे युवा खासदार अनुप धोत्रे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार रणधीर भाऊ सावरकर व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पातुर नगरपरिषदेवर भाजपचा विकासासाठी झेंडा फडकविण्याचे नागरिकांना आवाहन.शहराच्या मूलभूत सुविधा व विकासासाठी नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला एक वेळ संधी देऊन सत्तेत आणण्याचे आवाहन केले असून भाजपची पातुर नगर परिषदेवर सत्ता आल्यास 50 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन भाजपाचे नेते आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी पातुर येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

रविवारी पातुर येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शहराच्या सीमा वाढीचा प्रश्न असेल एमआयडीसीचा प्रश्न यासह विविध मुद्द्यांना हात घालत देवेंद्रजींच्या कार्यकाळात सर्व प्रश्न मार्गी लावू असे मुख्य प्रतोद भाजपा तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी सांगितले.
पातूर येथील न.प उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी खासदार अनुपभाऊ धोत्रे यांनी पातुरच्या समस्त नागरिकांनी मतदारांनी अध्यक्षपदाचे उमेदवार व भाजपच्या सर्वच्या सर्व शिक्षित व सक्षम उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले असून,पातुर साठी कुठल्याही परिस्थितीत विकास निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही खासदार अनुप भाऊ धोत्रे यांनी दिली.खासदार अनुप धोत्रे,आमदार रणधीर सावरकर,माजी महापौर विजय अग्रवाल, माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
यावेळी व्यासपीठावर माजी महापौर विजय अग्रवाल,माजी आमदार बळीराम सिरस्कार,महानगराध्यक्ष जयंतराव मसने, ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर,जिल्हा सरचिटणीस अंबादास उमाळे,डॉ.अमित कावरे,माजी प्राचार्य विजयसिंह गहीलोत,माजी न.प.उपाध्यक्ष गुलाब गाडगे, शेषराव फुलारी,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिनभाऊ ढोणे, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष कपिल खरप, पातुर मंडळ अध्यक्ष गणेश गाडगे, विवेक भरणे, किशोर कुचके, रमण जैन, प्रेमानंद श्रीरामे, भिकाभाऊ धोत्रे, तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.






